Monday, May 11, 2026 11:20:26 AM

LPG Cylinder Price Hike: निवडणुका संपताच सरकारने दिला मोठा दणका! आता LPG सिलेंडरसाठी मोजावे लागणार 993 रुपये; पाहा नवे दर

आता सरकारने मोठा झटका दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी उसळी झाल्याची माहिती समोर आली आहे.

lpg cylinder price hike निवडणुका संपताच सरकारने दिला मोठा दणका आता lpg सिलेंडरसाठी मोजावे लागणार 993 रुपये पाहा नवे दर

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणूकांनंतर सरकारने मोठा धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किमतीत झालेली वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला चटके देणारी ठरली.

तरी देखील सरकारने गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न केले. मात्र आता सरकारने मोठा झटका दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत मोठी उसळी झाल्याची माहिती समोर आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 993 रुपयांची वाढ झाली आहे. आधीची किंमत 2,078.50 रुपये होती जी आता 993 रुपयांनी वाढली आहे. या प्रचंड दरवाढीमुळे बाजाराचे अर्थशास्त्र पूर्णपणे विस्कळीत होण्यासहित याचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांच्या दैनंदिन संचालन खर्चावर होणार आहे.  

हेही वाचा- Mhada News: खुशखबर! म्हाडाच्या घराच्या किंमतींमध्ये मोठी कपात, अर्ज करण्याची मुदतही वाढली, जाणून घ्या

1 मे म्हणजेच आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर्सचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या दरात 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सर्वसामान्यांच्या वापरात असणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी घरगुती सिलिंडर वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. 

19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडर्सच्या नवीन दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 3071.50 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच राजधानी मुंबईत 3024 रुपये तर कोलकाता येथे 3201.50 रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे खाद्य उद्योग आणि लहान व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम बाजारातील अन्नपदार्थ आणि पेयांच्या किमतींवर होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागू शकते. मुंबईमध्ये घरगुती सिलिंडर्सची किंमत 912.50 रुपये कायम असून, त्यात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या