Sunday, November 16, 2025 05:24:50 PM

Mega Block : प्रवाशांनो सावधान! उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; लोकलसह एक्सप्रेस गाड्यांवरही होणार परिणाम; वाचा सविस्तर

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 19 ऑक्टोबर 2025 रोजी विद्याविहार आणि ठाणेदरम्यान 5 आणि 6 प्लॅटफॉर्मवर आवश्यक अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

mega block  प्रवाशांनो सावधान उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक लोकलसह एक्सप्रेस गाड्यांवरही होणार परिणाम वाचा सविस्तर

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 19 ऑक्टोबर 2025 रोजी विद्याविहार आणि ठाणेदरम्यान 5 आणि 6 प्लॅटफॉर्मवर आवश्यक अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत राहणार आहे. या ब्लॉकमुळे पुणे-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील', अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गवर सकाळी 11:40 ते सायंकाळी 4:40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/ बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गवर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 11:16 ते सायंकाळी 4:47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10:48 ते सायंकाळी 4:43 पर्यंत वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष गाड्या दर 20 मिनिटांनी चालविण्यात येतील. तसेच, ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गवर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गवर प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन खालीलप्रमाणे आहे

खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा वळवल्या जातील: 

11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस 

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन 

13201 पाटणा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस 

17221 काकीनाडा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस 

12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस  

12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस 

22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस 

12168 बनारस – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस 

12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 

12812 हाटिया – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस 

11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

हेही वाचा: FDA Seizes Unsafe Food: FDA ची कडक कारवाई! सणासुदीच्या काळात 8 लाख किलो निकृष्ट अन्न जप्त

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन खालीलप्रमाणे आहे

11055 लोकमान्य तिळक टर्मिनस – गोरखपूर गोडान एक्सप्रेस 

11061 लोकमान्य तिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस 

16345 तिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस 

17222 लोकमान्य तिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस 
 


सम्बन्धित सामग्री