शुभम उमाळे. प्रतिनिधी. मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी 22 जून रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाईल. 22 जून रोजी माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10:14 ते दुपारी 3:32 पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.
तसेच, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा लोकल रेल्वे वळवल्या जातील. दरम्यान, लोकल रेल्वे नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने नियोजित ठिकाणी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 11:07 ते दुपारी 3:51 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. पुढे, माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच, नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
घाटकोपर येथून सकाळी 10:41 ते दुपारी 3:10 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पुढीलप्रमाणे असतील:
मानखुर्द आणि नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन हार्बर मार्गावरील सेवा 11:15 ते 04:15 पर्यंत उशिराने नियोजित ठिकाणी पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 10:18 ते 03:28 वाजेपर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द केल्या जातील.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 10:37 ते 03:45 वाजेपर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
मात्र, मेगा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द आणि पनवेल - नेरुळ/ ठाणे दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10:00 ते दुपारी 04:30 पर्यंत ट्रान्स-हार्बर लाईन / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.