Sunday, June 15, 2025 11:52:01 AM

'वेळ आल्यास...'; राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांचा पलटवार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा टीका केली आहे. तर राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.

वेळ आल्यास राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांचा पलटवार

तुषार परदेसी. प्रतिनिधी. धुळे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा टीका केली आहे. 'महाराष्ट्रातून अनेकजण कामाख्या मंदिरात जायला लागले. प्राण्यांचे बळी देत त्यांच्या मुंडक्यांची पूजा करू लागले', असं संजय राऊत म्हणाले. तर राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.

हेही वाचा: पुण्यात मनसेला मोठं खिंडार; सुमारे 100 मनसे कार्यकर्ते शरद पवार गटात

काय म्हणाले संजय शिरसाट?

गुवाहाटी दौऱ्यावर राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, 'आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो, तिथे आम्ही प्राण्यांचे बळी वगैरे दिले असं त्यांचं म्हणणं आहे. जर आमच्याकडे शिंगा असतील तर आम्ही ते जपून ठेवलेत. तसेच वेळ आल्यावर कुणाच्या पोटात टाकायचं ते आम्ही ठरवू'. 

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, 'संजय राऊत मूर्ख आहे. त्या मुर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, जादूटोणा केलाय. बंगाली जादूगार घेऊन फिरणारे हे लोक आम्हाला कुठे जायला सांगतात? आम्ही मनोभावे अजूनही पूजा करतो, आजही आम्ही गुवाहाटीला जाऊ. त्यात गैर काय?'. 

हेही वाचा: विपश्यना केंद्रातील साधना पूर्ण करून धनंजय मुंडे बीडकडे रवाना


सम्बन्धित सामग्री