Wednesday, June 18, 2025 03:34:37 PM

पवारांमुळे मोदींची अटक टळली; नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे खळबळजनक दावे

खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत.

पवारांमुळे मोदींची अटक टळली नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे खळबळजनक दावे

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत.  बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी, शाहांना मदत केली. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे.  

'मोदींच्या विनंतीनंतर शाहांना जामीन...'
देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी-शाहांना मदत केली जात आहे. गुजरात दंगलीत तत्कालीन सीएम मोदी हे आरोपी होते. UPAच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली. अमित शाह एका खून प्रकरणात आरोपी होते. मोदींच्या विनंतीनंतर शाहांना जामीन मिळण्यास मदत झाल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी यांनी पुस्कातून केला आहे. दरम्यान शाहांप्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलले. जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. मोदी-शाहांनी बाळासाहेबांचं किती स्मरण ठेवलं? असा सवाल राऊतांनी केला आहे. 

हेही वाचा : अन्ननलिकेत अडकली मटणाची सहा हाडे; 52 वर्षीय रुग्णावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया

पुस्तकात कोणते खळबळजनक दावे?
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं. मोदी विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरु होता. गोध्राकांडात सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे होता. अनेक पोलीस अधिकारी, अमित शाहांना तुरुंगात जावं लागलं होतं. असा दावा राऊतांनी पुस्तकातून केला आहे. चौकशीची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत येऊन पोहोचली होती. मोदींना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांच्या भूमिकेला अनेकांची मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली असा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून केला आहे. 

'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली असा दावा राऊतांनी केला आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी आणि शाहांची कशाप्रकारे मदत केली होती, याचा सविस्तर घटनाक्रम या पुस्तकात मांडला आहे.


सम्बन्धित सामग्री