Thursday, May 22, 2025 06:36:44 PM

मुंबईकरांसाठी खुशखबर; सोमवारपासून आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल

सोमवारपासून, मुंबईमध्ये देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाले. या क्रूझ टर्मिनलमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर सोमवारपासून आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल

शुभम उमले. प्रतिनिधी. मुंबई: सोमवारपासून, मुंबईमध्ये देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाले. या क्रूझ टर्मिनलमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे. या टर्मिनलवर 200 हून अधिक क्रूझसाठी विविध सोई-सुविधा उपलब्ध असतील. यामुळे, क्रूझ प्रवाशांमध्ये 400 टक्क्यांहून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समुद्र किनाऱ्यावर उभं असलेलं शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई सध्या सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून भारतातील पहिले आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. सोमवारी, केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आयकॉनिक क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या सागरी पर्यटनात ऐतिहासिक वळण घेणाऱ्या या प्रकल्पाने, मुंबईकरांसाठी नवा सागरी दारवाजा खुला होणार आहे.

काही वर्षांपूर्वी, केंद्र सरकारने सागरमाला उपक्रमांतर्गत मुंबई येथे भारतातील पहिल्या प्रकारच्या आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, नव्याने तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे भारतातील अशा प्रकारचे पहिले आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनल असून 4.15 लाख वर्ग फूट क्षेत्रावर हे टर्मिनल बांधण्यात येत आहे. सदर टर्मिनल जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र विविध तांत्रिक आणि कामातील विलंबामुळे डिसेंबर 2024 पर्यंत ही डेडलाइन लांबवण्यात आली होती. अखेर युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर, सोमवारी हे टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे.

हेही वाचा: मोठी अपडेट! कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार..
 

495 कोटी खर्च:

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उभारण्यासाठी एकूण खर्च 495 कोटी रुपये करण्यात आला आहे. 495 कोटींपैकी 303 कोटी रुपये मुंबई पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणार असून उर्वरित खर्च खासगी ऑपरेटर्सकडून करण्यात आला आहे.

सुमारे 200 क्रूझ जहाजे:

भारतातील पहिले आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर सुमारे 200 क्रूझ जहाजे आणि दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता असणार आहे. हे टर्मिनल, आधुनिक यंत्रणा, मल्टी-लेव्हल पार्किंग, लक्झरी रिटेल आणि गॉरमेट डायनिंगसह एक अनुभवात्मक जागा पर्यटकांसाठी ठरणार आहे.

टर्मिनलमुळे रोजगाराच्या संधी:

सागरी पर्यटन वाढल्यानंतर, रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना आणि जागतिक पातळीवर मुंबईचा नवा चेहरा उभा राहील. हॉटेलिंग, ट्रान्सपोर्ट, टूर गाइड्स, स्थानिक कलावंत आणि हस्तकला यांना या संधीचा मोठा लाभ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा टर्मिनल म्हणजे सागरी अर्थव्यवस्थेचा नवा इंजिन ठरणार आहे.

क्रूझ प्रवाशांची संख्येत 400 टक्के वाढ:

सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 2014 पासून क्रूझमधील प्रवासी संख्येत 400 टक्के इतकी उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. 'क्रूझ भारत मिशन'ने फेऱ्यांची संख्या यापुढे आणखी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. मुंबईतील आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल डिसेंबरपर्यंत कार्यान्वित झाल्यामुळे आणखी या मिशनला हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टर्मिनलची वैशिष्ट्ये:

एकूण क्षेत्रफळ: 4.15 लाख वर्ग फूट  
 

ऑपरेशनल स्पेस: 1.7 लाख वर्ग फूट  
 

दरवर्षी 10 लाख प्रवासी हाताळणीची क्षमता  
 

200 हून अधिक क्रूझ जहाजांचे आगमन-निर्गमन  
 

22 लिफ्ट्स, 10 एस्केलेटर्स  
 

300 गाड्यांसाठी मल्टी-लेव्हल पार्किंग  
 

लक्झरी रिटेल, डायनिंग व फास्ट इमिग्रेशन


सम्बन्धित सामग्री