Tuesday, February 17, 2026 09:03:57 PM

Western Local Train : आता प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, नवीन वेळापत्रक समोर

श्चिम रेल्वे मार्गावर अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

western local train  आता प्रवास होणार सुखकर  पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ नवीन वेळापत्रक समोर

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून पश्चिम रेल्वे मार्गावर अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. 

सध्या गर्दीच्या वेळेत लोकल प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नवीन फेऱ्यांमुळे प्रवास अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1406 वरून 1410 इतकी वाढणार आहे.

हेही वाचा - Pune Bogus Doctor : रुग्णांची मोठी फसवणूक ! पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश 

सहावी मार्गिका सुरू झाल्यामुळे बोरिवली ते वांद्रे टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल सेवेसाठी उपलब्ध मार्गिकांवरील ताण कमी झाला आहे.

हेही वाचा - Maharashtra Weather Update: हवामानाचा यू-टर्न; थंडी गायब, आता 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा नवा अंदाज 

पश्चिम रेल्वेवर चार अतिरिक्त नवीन लोकल सुरु करणार असून या नवीन लोकल फेऱ्या अप आणि डाऊन दिशेने धिम्या मार्गावर प्रत्येकी दोन असणार आहेत. अप मार्गावर सकाळी 11.39 वाजता भाईंदर येथून वांद्रेला जाणारी लोकल सुटेल. त्यानंतर दुपारी 12.14 वाजता भाईंदर ते चर्चगेट अशी दुसरी लोकल धावेल. डाऊन मार्गावर वांद्रे येथून पहाटे 4.30 वाजता आणि दुपारी 1.२१ वाजता भाईंदरकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या असतील.
 


सम्बन्धित सामग्री