Saturday, February 14, 2026 01:35:31 PM

Mhada Lottery 2026 : आनंदाची बातमी! म्हाडाची मुंबईतील 3000 घरांसाठी लॉटरी, तारीख लवकरच होणार जाहीर

तीन हजार घरांची लॉटरीकाढण्याची तयारी सुरू केली आहे.

mhada lottery 2026  आनंदाची बातमी म्हाडाची मुंबईतील 3000 घरांसाठी लॉटरी तारीख लवकरच होणार जाहीर

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची लोक आतुरतेने वाट बघत असतात. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणूकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांची लॉटरी मार्चमध्ये जाहिर होण्याची शक्यता आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाने मुंबईतील मोक्याच्या जागांवर सर्वसामान्यांना अत्यंत माफक दरात घरे उपलब्ध करुन दिली आहेत.

हेही वाचा - Waris Pathan : 'फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हिरवा करू...', वारिस पठाण यांचं धक्कादायक वक्तव्य 

मार्च महिन्यात म्हाडाकडून घरांसाठी लॉटरी काढली जाऊ शकते. मात्र, या लॉटरीत मुंबईतील नेमक्या कोणत्या भागातील घरांचा समावेश असेल, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे चार हजार घरांचीही लॉटरी काढली जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या