मुंबई: मागील काही महिन्यांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे, राज्यातील काही जिल्ह्यांचे जनजीवन विस्खळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने माघार घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, राज्यात उकाडा पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई आणि मुंबईतील उपनगरांत भीषण उकाडा जाणवत आहे. पुढील काही दिवसात राज्यात भीषण उकाडा जाणवणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील 'या' जिल्ह्यात उकाड्याची शक्यता
मुंबई आणि नवी मुंबईत 'ऑक्टोबर हिट' चा परिणाम पाहायला मिळत आहे. आज मुंबईतील तापमान 35 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली जात आहे. तसेच, पालघर जिल्ह्यात तापमान 32 डिग्रीच्या पेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे उकाडा जाणवत आहे. सध्या, ठाणे जिल्हा तापमान 33 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे, दुपारपर्यंत तापमान 34 डिग्री किंवा त्याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात सध्या तापमान 36 डिग्री असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे जिल्ह्यात उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या, छत्रपती संभाजीनगरात तापमान 32 डिग्री आहे.
हेही वाचा: ST Workers Andolan : दिवाळीत बसणार प्रवाशांना फटका! एस.टी. कर्मचाऱ्यांची बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा
राज्यात उकाडा पडण्यामागील कारण काय?
पश्चिम-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र जरी कमी झाले असले, तरीही चक्राकार वाऱ्यांची स्थिती सुरुच आहे. त्यामुळे, राज्यातील किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे, मात्र, यादरम्यान पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.