मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीनुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक विभागांमधील 3 आणि 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची अंतिम मुदत 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. बदललेल्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थी आता 26 मे पर्यंत प्रवेशपूर्व प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्झिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी मुंबई विद्यापीठात ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मुंबई विद्यापीठाने पहिल्या वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत सुमारे 2,25,556 नोंदण्या झाल्या आहेत आणि 1, 45, 087 विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण 5,09,578 अर्ज सादर केले आहेत.
पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत खालील अभ्यासक्रम समाविष्ट आहेत:
बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., बीए.एमएमसी., बी.एसडब्ल्यू., बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडीज), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली), बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कंप्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायोकेमिस्ट्री), बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरोनॉटिक्स), बीएस्सी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा अॅनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट), एफ.वाय. बी.व्होक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स), एफवाय. बीएस्सी (बायोएनॅलिटिकल सायन्स - पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) यासोबतच, अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेंनी थार जप्त
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक :
1 - अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाईन/ऑफलाईन): 8 ते 26 मे, 2025 (दुपारी: 1:00 पर्यंत)
2 - प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर): 8 ते 26 मे, 2025 (दुपारी: 1:00 पर्यंत)
3 - ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख: 8 ते 26 मे, 2025 (दुपारी: 1:00 पर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक आहे) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
4 - पहिली मेरीट लिस्ट: 27 मे, 2025 (सायंकाळी: 5:00 वाजता)
5 - ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसोबत): 28 ते 30 मे, 2025 (दुपारी: 3:00 पर्यंत)
6 - द्वितीय मेरीट लिस्ट: 31 मे, 2025(संध्याकाळी 7:00 वाजता)
7 - ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे: 2 ते 4 जून, 2025 (दुपारी: 3:00 पर्यंत)
8 - तृतीय मेरीट लिस्ट: 5 जून, 2025 (संध्याकाळी 7:00 वाजता)
9 - ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे: 6 ते 10 जून, 2025 (दुपारी: 3:00 पर्यंत)
10 - कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन: 13 जून 2025 पर्यंत असेल.