बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या फलकामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. या फलकावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे फोटो आहेत. मात्र, विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचाही फोटो या फलकावर झळकत आहे.
हेही वाचा: ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबर धक्का; बडगुजर, घोलपांसह अनेक नेते भाजपमध्ये
वाल्मिक कराड हे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. 2020 साली बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात कराड यांच्यावर गंभीर आरोप झाले असून, त्यांना यापूर्वी अटक देखील करण्यात आली होती. तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या फलकावर त्यांचा फोटो झळकवला जातो, हे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे.
हेही वाचा: राज ठाकरे महायुतीत आले तरी काही उपयोग नाही; रामदास आठवले यांचा टोला
या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कार्यकर्त्यांच्या अज्ञानामुळे की हेतुपुरस्सर निर्णयामुळे असं घडलं यावर चर्चा रंगू लागली आहे. या बॅनरमुळे पक्षाच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.