Sunday, June 15, 2025 12:59:33 PM

नागपूर हिंसाचार प्रकरण; सूत्रधार फहीम खान याचा जामीन फेटाळला

17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्यानंतर दंगल उसळली. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरण सूत्रधार फहीम खान याचा जामीन फेटाळला

नागपूर: 17 मार्च रोजी नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्यानंतर दंगल उसळली होती. या हिंसाचाराबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. फहीम खान यांच्यावरील आरोप आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासामुळे न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. 17 मार्च रोजी नागपुरात हिंसाचार झाला आणि 18 मार्च रोजी फहीम खान यांना अटक करून देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. सध्या, आरोपी फहीम खान नागपूर कारागृहात आहे. यादरम्यान, फहीम खानने केलेल्या जामीन अर्जावर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

हेही वाचा: नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात महिलेला आणि तरुणाला बेदम मारहाण

न्यायालयाने फहीम खानला जामीन देण्यास का नाकारले?

'17 मार्च रोजी नागपूर येथे झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खान आहे. त्याच्या चिथावणीनेच ही घटना घडल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. जर अशा आरोपीला आपण जामिनावर सोडलं तर तपासावर त्याचा परिणाम होऊ शकतो', असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

'नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार फहीम खान आहे. त्याच्या चिथावणीनेच ही घटना घडली असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अशा आरोपीला जामिनावर सोडल्याने तपासावर परिणाम होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, तो साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतो. त्यासोबतच, तपासणीत अडथळा देखील येऊ शकतो', असेही न्यायालयाने जामीन फेटाळताना म्हणाले.

फहीम खानने विविध लोकांना प्रक्षोभक व्हॉइस मेसेज पाठवून समाजात तेढ निर्माण केली होती. त्यामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या. अशा आरोपीला जामीन देणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. फहीम खानने विविध लोकांना उत्तेजक व्हॉइस मेसेजेस पाठवत समाजात तेढ निर्माण केली होती, ज्यामुळे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात दंगल झाल्याचे पाहायला मिळाले. 'अशा आरोपीला जामीन देणं योग्य नाही', असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. यापूर्वीही, फहीम खानवर विविध प्रकारचे गुन्हे नागपूर येथील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. तसेच, दोन्हीकडील बाजू ऐकल्यानंतर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फहीम खानच्या जामीन अर्जाला नकार दिला आहे.

हेही वाचा: आंतरजातीय विवाह केल्याने नर्स सासूने घरीच केला सुनेचा गर्भपात

नागपूर येथील हिंसाचार प्रकरण:

17 मार्चच्या रात्री नागपूर येथे ही दंगल उसळली होती. त्या रात्री दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यानंतर, नागपूरात बराच तणाव निर्माण झाला होता. ही घटना नागपूर शहरातील महाल परिसरात घडली. यादरम्यान, मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तर, काही वाहनांना आगही लावण्यात आली. या प्रकरणात, 80 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.


सम्बन्धित सामग्री