नांदेड: प्रॉपर्टीच्या वादातून बायकोने नवऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नांदेडमधील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात नवऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
नांदेडमधील धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये पत्नी पतीला जोरदार मारहाण करत आहे आणि वेदनेने पती जोरजोरात ओरडत आहे. मात्र या बायकोला नवऱ्याची जरा सुद्धा दया येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मारहाण करताना मेव्हुणा त्याला पकडून बायकोला साथ देत आहे.
नांदेडमध्ये कौटुंबिक वादातून बायकोने नवऱ्याला बदडलं आहे. यात पत्नीला मारहाण करताना मेव्हुण्याने मदत केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.