Tuesday, February 17, 2026 09:00:30 AM

AC Local on Harbour Line : नवी मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार! 26 जानेवारीपासून हार्बर लाइनवर धावणार AC लोकल, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

सीएसएमटी–पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे.

ac local on harbour line  नवी मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार 26 जानेवारीपासून हार्बर लाइनवर धावणार  ac लोकल जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 26 जानेवारी 2026 ला प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी/वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी–पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे.

यापूर्वी दि. 1 डिसेंबर 2021 रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र एसी लोकलचे तिकीट व पासचे दर सामान्य लोकलपेक्षा अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.  सध्या मध्य रेल्वेवर  1820 लोकल  चालू आहेत ज्यापैकी 80 एसी लोकल या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून कल्याणपर्यंत चालवल्या जात आहेत.  26 जानेवारीला 14 एसी लोकल या हार्बर लाइनवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पनवेल पर्यंत चालवण्यास सुरुवात होईल. 

कसं असेल वेळापत्रक ?
पहिली लोकल 4.15 मिनिटांनी वाशीपासून वडाळा रोड पर्यंत चालवली जाईल नंतर ती परतीचा प्रवास करून परत येईल. त्यानंतर पनवेल वरून 9 वाजून 9 मिनिटांनी सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दहा वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेद्वारे दोन एसी लोकल असतील पहिली लोकल वडाळावरून निघेल तर दुसरी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून निघेल.  या सर्व लोकल सुट्टीच्या दिवशी सोडून बाकीच्या सर्व दिवशी या लोकल चालवल्या जातील. 


 


सम्बन्धित सामग्री