Tuesday, March 17, 2026 02:12:09 PM

National President of NCP : NCP च्या अध्यक्षपदी 'पवारच'; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक 15 दिवसात

येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

national president of ncp  ncp च्या अध्यक्षपदी पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक 15 दिवसात

मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघतातील अकाली मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत गेले. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांची पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतापदीदेखील त्यांनी एकमताने निवड झाली. दरम्यान, राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ठराविक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित यश मिळाले. मात्र अजूनही राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे स्थान रीक्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण बसणार, या चर्चांना उधाण आले असतानाच निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होणार असल्याचे समजते. येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार असून यात सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या दोघांपैकी एकाची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटेल, अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाल्यानंतरच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच्या विलिनीकरणावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. 

हेही वाचा : Mayor Ritu tawde : 'गेल्या साडेचार वर्षात मुंबई महापालिकेत सुरू होता भोंगळ कारभार'; महापौर रितू तावडे संतापल्या; सांगितला घुसखोरांवरील कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन


सम्बन्धित सामग्री