Wednesday, February 18, 2026 05:54:07 PM

BMC Election Results 2026 : ना डॅडींची ताकद चालली, ना वायकरांचा करिश्मा! मुंबई महापालिका निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा सुपडा साफ

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना आणि नातेवाईकांना या निवडणुकीत मोठा दणका बसला असून, ठाकरे गटाने अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.

bmc election results 2026  ना डॅडींची ताकद चालली ना वायकरांचा करिश्मा मुंबई महापालिका निवडणुकीत या बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा सुपडा साफ

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत यंदा मतदारांनी 'नातेवाईक' आणि 'राजकीय वारसां'ना स्पष्ट नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना आणि नातेवाईकांना या निवडणुकीत मोठा दणका बसला असून, ठाकरे गटाने अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिंदे गटाला वैयक्तिक धक्के 

समाधान सरवणकर (माहीम-प्रभादेवी): दादरच्या बालेकिल्ल्यात सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी 603 मतांनी पराभव केला. मतमोजणीवर आक्षेप घेऊनही समाधान यांना विजय मिळवता आला नाही.

हेही वाचा - BMC Election Results 2026: मुंबईत 'ठाकरे फॅक्टर' फेल? महायुतीची सुसाट मुसंडी; देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत सत्तांतराचे संकेत?

दीप्ती वायकर-पोतनीस (जोगेश्वरी): खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्येलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. वॉर्ड क्रमांक 73 मधून ठाकरे गटाच्या लोना रावत यांनी त्यांचा पराभव करत वायकरांचा गड पोखरला.

वैशाली शेवाळे (धारावी): माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा काँग्रेसच्या आशा काळे यांनी 1450 मतांनी पराभव केला.

इतर दिग्गजांना बसलेले हादरे

नवाब मलिकांना धक्का: राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा कुर्ला (वॉर्ड 165) मध्ये काँग्रेसच्या अशरफ आझमींनी पराभव केला.

डॅडींच्या कन्येची पिछेहाट: भायखळ्यातील प्रबळ उमेदवार मानल्या जाणाऱ्या अरुण गवळी यांच्या कन्या योगिता गवळी यांनाही पराभवाचा धक्का बसला असून, तिथे भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 

हेही वाचा - KDMC Election Results 2026 : केडीएमसीमध्ये महायुतीचा 'डंका'; निकाल पूर्ण होण्याआधीच भाजपकडून 50-50 चा 'महापौर' फॉर्म्युला!

कुणाचे वारसदार विजयी झाले?

पराभवाच्या लाटेतही काही नातेवाईकांनी आपला विजय निश्चित केला आहे:

तेजस्वी घोसाळकर (भाजप): माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसरमधून 10000 हून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला.

प्रकाश दरेकर (भाजप): भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी प्रभाग 3 मधून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.

पूजा महाडेश्वर (ठाकरे गट): माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांची कन्या पूजा महाडेश्वर यांनी वडिलांचा वारसा जपत विजय मिळवला.

सोनम जामसूतकर (ठाकरे गट): मनोज जामसूतकर यांची कन्या सोनम यांनीही दक्षिण मुंबईतून विजय खेचून आणला.
 


सम्बन्धित सामग्री