Tuesday, February 17, 2026 06:05:19 PM

Neral Khopoli : नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला; शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाचे नाव समोर

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणतीही धामधूम न करता अनेक पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच नेरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

neral khopoli  नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाचे नाव समोर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली असताना जिल्हा परिषद निवडणुकीत कोणतीही धामधूम न करता अनेक पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशातच नेरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आला आहे. सुरेश टोकरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यादरम्यान तीन आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आता अटक झालेले आहेत. त्याचसोबत शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत. सुरेश टोकरे यांच नाव समोर आल्यामुळे सध्या नेरळमधील राजकारण चर्चेत आलं आहे. सुरेश टोकरे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. वादातूनच हल्ला झाला की पूर्व वैमनस्या मधून हल्ला झाला याचा तपास पोलीस करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री