Wednesday, July 09, 2025 08:36:01 PM

'राऊत, आधी तुझा मालक किती चपट्या पायाचा आहे हे बघ'; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

नितेश राणेंचे ठाकरे कुटुंबावर अघोरी पूजेसह गंभीर आरोप; मातोश्री व फार्महाऊसबाबत पुरावे असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ.

राऊत आधी तुझा मालक किती चपट्या पायाचा आहे हे बघ नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Nitesh Rane slams Uddhav Thackrey: शिवसेनेचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत ठाकरे कुटुंबावर थेट आरोप केले आहेत. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर राणेंनीही आपली भूमिका स्पष्ट करत 'मातोश्री'च्या तिसऱ्या मजल्यावर अघोरी पूजा होत असल्याचा दावा केला आहे. 'मी तारखेसह सांगू शकतो की कोणत्या दिवशी काय कापलं गेलं, मीठ कुठे ठेवलेलं होतं. कॅलेंडरसुद्धा देऊ शकतो,' असं वक्तव्य करत राणे यांनी थेट मातोश्रीतील धार्मिक क्रियांवरच संशय उपस्थित केला आहे.

हेही वाचा: राज ठाकरे महायुतीत आले तरी काही उपयोग नाही; रामदास आठवले यांचा टोला

तसेच, त्यांनी कर्जतच्या फार्महाऊसखाली काही गोष्टी पुरल्या असल्याचंही गंभीर विधान केलं. 'तिथे जमिनीखाली काय काय पुरले आहे, ते मी सांगू शकतो,' असा इशाराही त्यांनी दिला. रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, 'मी आधीच सांगितलं होतं की वहिनींचा हस्तक्षेप आहे, भरत गोगावले यांनी फक्त त्यावर शिक्कामोर्तब केलं.'

संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला. 'संजय राऊत, आधी तुझा मालक किती चपट्या पायाचा आहे हे बघ,' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

हेही वाचा: ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबर धक्का; बडगुजर, घोलपांसह अनेक नेते भाजपमध्ये

पूर्वीही नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. मात्र या वेळी त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्त होऊन काही गोष्टींचा पुरावा देण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


सम्बन्धित सामग्री