Wednesday, February 18, 2026 05:43:00 PM

Devendra Fadnavis Road Show : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; स्वत: चालवली बुलेट, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री स्वतः रॉयल एनफिल्डवर स्वार होऊन रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

devendra fadnavis road show  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो स्वत चालवली बुलेट पाहा व्हिडीओ

Devendra Fadnavis Road Show :  नागपूर महानगरपालिका (एनएमसी) निवडणुकीच्या रणधुमाळीचा शेवटचा दिवस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाकेबाज रोड शोने गाजला. मुख्यमंत्री स्वतः रॉयल एनफिल्डवर स्वार होऊन रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून संपूर्ण शहर आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.

'बुलेट'वरून मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुपारी 12.15 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीला सुरुवात झाली. भारत माता चौक, तीन नळ चौक, शहीद चौक, महाल आणि गांधी पुतळा यांसारख्या शहरातील प्रमुख भागांतून ही रॅली काढण्यात आली. मतदारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा प्रचार केला. या रॅलीत राज्यस्तरीय नेत्यांसह समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती.

हेही वाचा - BMC Election Time Update: मतदानाला लवकर निघा, वेळ कमी आहे; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

राजकीय दिग्गज मैदानात

या निवडणुकीत 151 जागांसाठी 993 उमेदवार नशीब आजमावत आहेत. भाजपने वरिष्ठ नेत्यांच्या सभांवर भर दिला, तर काँग्रेसने विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनीही सभा घेतल्या. शिवसेना (UBT), आप आणि मनसे यांसारख्या पक्षांनीही प्रचारात आपली ताकद पणाला लावली आहे. 

हेही वाचा - Sanjay Raut : 'आण्णा मलाई हा महाराष्ट्रात प्रचाराला आला आणि...', विरोधकांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

प्रशासकीय तयारी आणि कडक अंमलबजावणी

महापालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी अभिजीत चौधरी यांनी माहिती दिली की, निवडणूक यंत्रणा मतदानासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणी दरम्यान आतापर्यंत 42 लाख रुपयांची रोकड, दारू आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आज संध्याकाळी 5.30 पासून 48 तासांचा प्रचारबंदीचा कालावधी (Silent Period) सुरू झाला असून, आता उमेदवारांना केवळ वैयक्तिक भेटीगाठी घेता येणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री