Saturday, June 14, 2025 03:50:15 AM

संततधार पावसामुळे कोयनानगरमधील ओझर्डे धबधबा वाहू लागला

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वळीवच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे.

संततधार पावसामुळे कोयनानगरमधील ओझर्डे धबधबा वाहू लागला

कराड: सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वळीवच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. सध्या कोयनानगर मधील ओझर्डे धबधबा देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. साधारणपणे पावसाळ्यात वाहणारा ओझेर्डे धबधबा या वर्षी मे महिन्यात अचानक वाहू लागला. त्यामुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. तसेच, पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे या ओझर्डे धबधब्याचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. 

हेही वाचा: हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिला आहे? पाहाच

कोयनानगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे म्हणणे आहे की, 'पर्यटकांची संख्या कमी असल्या कारणाने धबधब्याजवळ निसर्गरम्य शांतता टिकून आहे. तसेच, निसर्गाचे वेगळेच स्वरूप अनुभवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे'. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने ओझेर्डे फॉल्स परिसरात 'स्काय वॉक' नावाचा बहुउद्देशीय प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांना धबधब्याचे चित्तथरारक सौंदर्य अनुभवता येईल आणि कोयनाच्या निसर्गाचे महत्त्व जगापर्यंत पोहोचेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोयनानगर पर्यटन नकाशावर ठळकपणे उभे राहील.


सम्बन्धित सामग्री