Friday, May 16, 2025 01:02:25 PM

Pahalgam Terror Attack: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरकडे रवाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणणार असे आश्वासन शिंदेंनी यावेळी दिले आहे.

pahalgam terror attack उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरकडे रवाना

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणणार असे आश्वासन शिंदेंनी यावेळी दिले आहे. खाजगी विमानाने ते श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय मदतकार्याला येणार वेग येणार आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आज खाजगी विमानाने ते जम्मू काश्मीरला रवाना झाले. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेची मदत पथक मंगळवारीच श्रीनगरला रवाना झाले होते. त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू आणि काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे. तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास एकनाथ शिंदे सर्वात आधी मदतीला धावून जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा : Pahalgam Terror Attack: राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर

श्रीनगरमध्ये शिवसेनेचे मदत पथक दाखल झाले आहे. राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. शिवसेनेचे मदत पथक मंगळवारी रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे. धर्म विचारुन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या आहेत. 


 


सम्बन्धित सामग्री