Thursday, May 22, 2025 09:23:08 PM

Pahalgam terror attack: संतोष जगदाळेंवर मुलगी आसावरी जगदाळेने केले अंत्यसंस्कार

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पुणे विमानतळावर त्यांना आणले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

pahalgam terror attack संतोष जगदाळेंवर मुलगी आसावरी जगदाळेने केले अंत्यसंस्कार

पुणे : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे पुणे विमानतळावर त्यांना आणले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी शरद पवार यांनी जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली. 

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यात मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा  समावेश आहे. त्यांना पहलगाममधून महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी पहाटे त्यांना पुणे विमानतळावर आणले. त्यानंतर आज पुण्यातील संतोष जगदाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने त्यांच्यावर अंत्यंसंस्कार केले. यावेळी शरद पवार यांनी जगदाळे कुटुंबियाची भेट घेतली. 

हेही वाचा : केंद्रीय सुरक्षा समितीकडून हल्ल्याचा तीव्र निषेध; भारताचे पाच निर्णय पाकिस्तानसाठी घातक ठरणार

पुण्यातील कर्वेनगर येथे शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुबांची भेट घेतली. यावेळी पवारांनी आसावरी जगदाळेसोबत संवाद साधला. आसावरी जगदाळे म्हणाल्या, "डोळ्यात गोळ्या मारल्यात. त्याने थेट गोळ्या घातल्या, काही विचारलं देखील नाही. मास्क लावून आले होते. शेर आला शेर आला म्हणून पळून गेले. तिकडे कुणीच नव्हते, अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं. उपचारासाठी दिरंगाई झाली" असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना, "टुरीझम बंद करा, कायमचा बंदोबस्त करा. त्यांना तशाच गोळ्या घाला. लहान लहान मुलांना मारले, आम्ही चिखलात पडलो. ते पाच जण होते आणि त्यांनी मास्क घातले होते. मला चेहरा देखील बघायला मिळाला नाही" असे संतोष जगदाळेंची मुलगी आसावर जगदाळे यांनी म्हटले. 

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांना गोळ्या घातल्या. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील दोन. डोबिंवलीतील तीन आणि पनवेलमधील एक जण आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारत सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पाकिस्तानवर पाच मोठे निर्बंध लावले आहेत.  

महाराष्ट्रातील मृतांची नावे - 
अतुल मोने - डोंबिवली
संजय लेले - डोंबिवली
हेमंत जोशी - डोंबिवली
संतोष जगदाळे - पुणे
कौस्तुभ गणबोटे - पुणे 
दिलीप देसले - पनवेल 

 


सम्बन्धित सामग्री