Wednesday, June 25, 2025 12:22:47 AM

Palghar Crime: अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पालघरमधील शिवसेनेच्या अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी त्याला अटक केली.

palghar crime अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

पालघर: पालघरमधील शिवसेनेच्या अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी त्याला अटक केली. 

शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अखेर पाच महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली. फरार असलेल्या अविनाश धोडी याला महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दादरा नगर हवेलीच्या परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडी याला अटक करण्यात आली. मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला जेरबंद करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश मिळाले आहे.

हेही वाचा : Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' टॉप संदेश

नेमकं प्रकरण काय? 
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची अपहरणानंतर हत्या झाल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. 20 जानेवारीपासून अशोक धोडी फरार होते. गुजरातमध्ये बंद पडलेल्या खाणीमध्ये गाडीत त्याचा मृतदेह सापडला. या घटनेत अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडी मुख्य आरोपी असल्याचे समोर आले होते. अविनाशला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र पोलिसांना गुंगारा देत तो पळून गेला. गेले साडे चार महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. गुजरातमधील सिलावासामधून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींविरोधात न्यायालयाने गुन्हेगारी वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ असून त्या दोघांमध्ये जमीन आणि संपत्तीवरुन वाद होते. अविनाश हा दारुचा व्यवसाय करत असून परिसरात त्याची दहशत आहे. या अगोदरही अविनाश धोडी याने अशोक धोडीवर हल्ला केला होता.


सम्बन्धित सामग्री