Sunday, November 16, 2025 06:13:28 PM

Pandharpur : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये 'चिकन मसाला'ची पाकिटं, बीव्हीजी कंपनीला नोटीस

दिवाळी भेटवस्तूमध्ये चिकन मसाला असल्याचे आढळून आले आहे.  या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

pandharpur   श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये चिकन मसालाची पाकिटं बीव्हीजी कंपनीला नोटीस

सर्वत्र सध्या दिवाळीची लगबग दिसून येत आहे. मात्र अशातच आता  पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या  दिवाळी भेटवस्तूमध्ये चिकन मसाला असल्याचे आढळून आले आहे.  या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भेटवस्तू देण्यात आल्या. परंतु भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट असल्याचे दिसून आले.वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

 हेही वाचा - Shirdi Crime : शिर्डी साई संस्थान प्रशासनात मोठा घोटाळा उघड; 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल 

बीव्हीजी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे त्यामध्ये चिकन मसाला पाकीट देऊन कंपनीने एक प्रकारे वारकरी संप्रदायाची थट्टा उडवलेली आहे आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी दिला आहे 

 हेही वाचा - Best Bus Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! प्रशासनानं केला 31 हजार रुपयांचा बोनस जाहीर 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सुरक्षेचा ठेका बीव्हीजी कंपनीला देण्यात आला असून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आलेल्या किट मध्ये चिकन मसाला पाकीट असल्याचे निदर्शनास आल्याने मंदिर समिती कडून बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे 24 तासात नोटीसला देणं बंधनकारक करण्यात आले असून कंपनीच्या उत्तरानंतर योग्य ती कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली 


सम्बन्धित सामग्री