Sunday, March 08, 2026 12:13:01 PM

Devendra Fadanvis on Ajit Pawar Condolonce : 'कधीही कल्पना केली नव्हती कि दादांचा...', सभागृहात शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावूक

. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव सादर केला.

devendra fadanvis on ajit pawar condolonce  कधीही कल्पना केली नव्हती कि दादांचा सभागृहात शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावूक

आजपासून महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सभागृहातील सर्व नेतेमंडळी भावूक झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव सादर केला. 

शोकप्रस्ताव सादर करताना ते म्हणाले की, कधीही कल्पना केली नव्हती कि दादांचा शोक प्रस्ताव मांडावा लागेल. आज दुर्देवाने दादा आपल्यामध्ये नाहीत. खंरतर यावर्षी  दादांनी 12 वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर अंतुले यांची बरोबरी केली असती.

हेही वाचा - Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : 'ब्लॅक बॉक्स जळाला पण आमच्याकडे फोटो...', अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट 

यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कठोर निर्णय घ्यायचा असेल तर कधीही मागेपुढे पाहायला ते कमी करत नसत.  लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार पडतोय पुर्नविचार करावा असं म्हटलं तरीही दादा ठाम राहीले.माझ्या करीता अत्यंत भावूक असा क्षण आहे. काही गोष्टींवर काळ हे औषध असतं. मात्र काही गोष्टींवर देखील काळ हे औषध नाही. आता अशा प्रकारचे अजित दादा पुन्हा होऊ शकत नाही. आपल्या सर्वांसाठी हा एक प्रकारे धक्का आहे. सकाळी 6 वाजल्या पासून काम करणारा नेता हि त्यांची ख्याती होती. 

हेही वाचा - Nashik Municipal Corporation: नाशिकच्या 'स्थायी' सभापतीपदासाठी भाजप कोणाच्या नावाला देणार पसंती?; उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस 

आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते जातात तेव्हा कमतरता जाणवते. पण अजितदादांसारखा माणूस जो राजकारणात स्थिरावला आहे.  ज्याने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत, आपलं स्वत:चं अस्तित्व, नेतृत्व निर्माण केले आहे. अशी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, तेव्हा पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या लक्षात येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


सम्बन्धित सामग्री