Monday, March 09, 2026 08:35:41 AM

NCP Parth Pawar : एकीकडे 'वहिनीपर्व' सुरू होत असताना पार्थ पवारांच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी

येत्या 16 मार्च रोजी राज्यातील सात राज्यसभेच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच पार्थ पवार हे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार असणार असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

ncp parth pawar  एकीकडे वहिनीपर्व सुरू होत असताना पार्थ पवारांच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी

येत्या 16 मार्च रोजी राज्यातील सात राज्यसभेच्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार असणार असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. राज्यातील सात राज्यसभेच्या जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार अर्ज दाखल करतील असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार पार्थ पवार यांच्या पाठीशी असून यावेळी एकमुखाने एक मताने पार्थ पवार यांची निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा- Eknath Shinde On Ladaki Bahin Yojna : लवकरचं लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये; शिंदेंनी सभागृहात केली मोठी घोषणा
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. 26 फेब्रुवरीला मुंबईतील वरळी डोंब या सभागृहात होणार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आज संध्याकाळी 5 वाजता होणार राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा- Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखात वगळता इतर खाती आणि तसेच विधीमंडळ गटनेता पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी तत्काळ हाती घेतली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांची पक्षातील सर्व नेत्यांकडून एकमताने निवड झाली असल्याची माहिती आहे. तसेच पार्थ पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मोठी घोषणा होणार आहे.


सम्बन्धित सामग्री