Tuesday, February 17, 2026 06:01:57 PM

Public Holiday: मतदानासाठी 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर! मात्र काही कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी विशेष सवलत

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.

public holiday मतदानासाठी 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर मात्र काही कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी विशेष सवलत

सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर महानगरपालिकेसह (BMC) संबंधित पुणे, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, जळगाव आणि धुळे यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येसर्व क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कंपन्या, आयटी हब आणि अगदी मॉल्समधील कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा- Election Commission: रस्त्यावरचा प्रचार संपला, घरोघरी प्रचार सुरुच; आयोगाच्या निर्णयाने सगळेच चकित

तसे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे. या पत्रकात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल, शॉपिंग सेंटर, किरकोळ विक्रेते इत्यादिंना हे नियम लागू असणार आहेत. मतदारांना गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुलांसोबत असलेले एकल पालक, गर्भवती महिला आणि मतदारांच्या इतर दुर्बळ घटकांना वीजपुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालयाची सोय आणि रॅम्पची व्यवस्थाही असेल.

हेही वाचा- BMC Election Helpline Number: मतदानाला जायला बॉस सुट्टी देत नाहीये? मग 'या' नंबरवर करा एक फोन; पालिकेची होणार थेट कारवाई

दरम्यान या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित कंपनीच्या  मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे. काही अत्यावश्यक सेवा किंवा अशा आस्थापना जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, अशा ठिकाणी प्रशासनाने लवचिकता दाखवली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे सक्तीचे असेल. जर तुम्हाला तुमच्या कार्यालयाने किंवा मालकाने 15 जानेवारी रोजी मतदानासाठी सुट्टी देण्यास नकार दिला, तर गप्प बसू नका. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी पालिकेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. सुट्टी न मिळाल्यास तुम्ही 9122-31533187 या क्रमांकावर थेट संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. तुमच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित आस्थापनेवर तात्काळ कारवाई केली जाईल.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या