पुण्यातून मित्रानेच मित्राचा घात केल्याची एक धक्कादायक घडना समोर आली आहे. माणगाव पोलिसांना पुण्यातील ताम्हणी घाट परिसरातील सणसवाडी गावच्या परिसरात 11 जानेवारी 2026 रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळ्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचताच मृत तरुण 22 वर्षाचा असल्याचा अंदाज लावण्यात आला. मृत तरुणाच्या शरीरावर अनेक वार केलेले होते. घटनेचा तपास करताच एक मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली.
समोर आलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय तरुण आदित्य गणेश भगत हा त्याचे तीन मित्र अनिकेत वाघमारे, तुषार पोटोळे आणि प्रज्वल हंबीर यांच्यासोबत पुण्याहून महाबळेश्वरला इनोव्हा क्रिस्टा कारने फिरायला गेला होता. दरम्यान प्रवास करत असताना आदित्यचा त्याच्या तीन मित्रांसोबत पैशांवरून वाद झाला. काही वेळाने या वादाचे गंभीर रुप पाहायला मिळाले. वाद विकोपाला पोहचल्यामुळे आदित्यचा त्याच्याच मित्राने चालू प्रवासात दोरीने गळा दाबला, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला होता.
त्यानंतर त्याच्या मित्रांनी सणसवाडी गावच्या परिसरातील 'सिक्रेट पॉईंट' येथे आदित्यला आणले आणि त्याच्या शरीराच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर सपासप वार करून त्याची हत्या केली. एवढचं नव्हे तर त्याचा मृतदेह देखील तिथेच टाकून ते आरोपी फरार झाले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी कसून चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे रायगड पोलिसांनी तातडीने पुणे शहर आणि ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली, आणि अवघ्या 6 ते 8 तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, या घटनेमुळे ताम्हणी घाट आणि पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.