Sunday, March 08, 2026 01:45:32 PM

BJP Strict Action: आधी पक्षाला नडला, आता पक्षाबाहेर काढला; शिस्त मोडणाऱ्या भाजपच्या 69 शिलेदारांवर पक्षाचा 'सर्जिकल स्ट्राईक'

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई तात्काळ लागू करण्यात आली असून, पक्षशिस्तीचा कडक संदेश देण्यात आला आहे.

bjp strict action आधी पक्षाला नडला आता पक्षाबाहेर काढला शिस्त मोडणाऱ्या भाजपच्या 69 शिलेदारांवर पक्षाचा सर्जिकल स्ट्राईक

पुणे: राजकारणात 'शिस्त' हाच कणा मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीने पुणे शहरात एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षादेश धुडकावून अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या तब्बल 69 कार्यकर्त्यांवर भाजपने निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या थेट आदेशानुसार या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बंडखोरांना 'दे धक्का'; शिस्तीचा बडगा

"पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही," हा संदेश देण्यासाठी भाजपने हे कठोर पाऊल उचलल्याचे दिसते. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली, अशा 69 जणांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना पुढील सहा वर्षे पक्षाची कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिले जाणार नाही. ऐन निवडणुकीच्या निकालांनंतर आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय म्हणजे बंडखोरांसाठी एक प्रकारचा 'धडा' मानला जात आहे.

हेही वाचा: Farmer Security Bill: शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे पाऊल; अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 25 लाखांची मदत; संसदेत ऐतिहासिक विधेयक सादर

प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीने आदेश जारी

या कारवाईचे अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे. या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, "पक्षाच्या ध्येय आणि धोरणांविरुद्ध जाऊन निवडणूक लढवणे हा गंभीर शिस्तभंग आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही." ही कारवाई तात्काळ लागू करण्यात आली असून, या यादीमध्ये अमोल बालवडकर, किशोर तरवडे यांसारख्या स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या नावांचाही समावेश असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्षातून (भाजप) हकालपट्टी करण्यात आलेल्या 69 कार्यकर्त्यांची नावे खालीलप्रमाणे

संदीप लोणकर, नवल कुसाळ, ऐश्वर्या जाधव, विनोद मोहिते, स्मिता खेडकर, अर्चना योगेश सूर्यवंशी, समीर पठाण, समाधान शिंदे, बापू पोकळे, अमोल बालवडकर, पल्लवी गाडगीळ, दत्ता भगत, छाया गवळी, सतीश मारकड, बाळासाहेब सानवडे, मंजू वाघमारे, योगेश सूर्यवंशी, रमेश भंडारी, जितेंद्र जगताप, अप्पणा दादावाडकर, प्रविण खेडकर, युवराज कुञ्जेकर, प्रकाश डोरे, रुपेश धुले, इफ्तियाज मोमीन, सुवर्णा भरेकर, मोहिनी देवकर, सोमनाथ गुंड, संगिता ठोसर, किशोर तरवडे, संतोष शिंदे, चंद्रकांत पाटे, राहुल रामे, प्रीतम नागापुरे, किरण वाळुंज, बंडू जाधव, संदीप जन्हाड, नितीन मारकड, मानसी सोमनाथ गुंड, मधुकर मुसळे, सुरेश धनगर, जितेंद्र टकले, किशोर वाघमारे, धनंजय जाधव, अमोल रायकर, पल्लवी केदारी, अकबर पठाण, पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर, विजय चौगुले, नीता थोरवे, उज्वला गोडे, हरीष परदेशी, सुनीता गलांडे, बाळासाहेब घोडके, कादंबरी साळवी, अनिता तळाठी, स्मिता गायकवाड, प्रीती वालकर, अभिजीत उपाध्ये, प्रणव मोरे, नलिनी मोरे, अनिल मेमाणे, वर्षा मारकड, संदीप पोकळे, रितेश रासकर, सचिन दशरथ दांगट, सुरेंद्र कांबळे, राजू साखरे, स्वाती धनगर

गद्दारांना थारा नाही; जिल्हाध्यक्षांचा इशारा

केवळ निलंबनच नाही, तर भविष्यातही जर कोणी पक्षविरोधी भूमिका घेतली, तर त्यांच्यावर यापेक्षाही कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. "एकवेळ पराभव पत्करू, पण गद्दारी सहन करणार नाही," अशा तीव्र भावना निष्ठावान कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. या निर्णयामुळे पुणे भाजपमध्ये आता केवळ निष्ठावंतांनाच स्थान असेल, हे अधोरेखित झाले आहे.

स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार?

पुणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या या 69 कार्यकर्त्यांच्या निलंबनामुळे स्थानिक गणिते बदलण्याची शक्यता आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची हकालपट्टी करणे हा भाजपचा धाडसी निर्णय ठरतो की संघटना मजबूत करण्याचा मास्टरस्ट्रोक, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, सध्या तरी "आधी शिस्त आणि मगच पद" या भाजपच्या भूमिकेमुळे इच्छुकांच्या गोटात शांतता पसरली आहे.

हेही वाचा: Canada School Shooting: कॅनडा हादरलं! शाळेत अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू तर 25 जखमी; हल्लेखोरानेही संपवलं जीवन


सम्बन्धित सामग्री