मुंबईसह महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते. काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत असते. पुणे शहरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर एकत्र येऊन रंगांची उधळण करतात.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - Eknath Shinde Call : ठाण्यातील नागरिकही दुबईत अडकले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फोनवरून साधला सवांद
त्याचप्रमाणे, धूलिवंदन सणानिमित्त मंगळवारी 3 मार्चला बेलापूर ते पेणधर या मेट्रो मार्गावरील मेट्रो सेवा सकाळच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रवासी संख्या कमी असल्याने तसेच सणानिमित्त आवश्यक नियोजनासाठी सकाळची मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा - Holi 2026 : होळीपौर्णिमेला श्री साईसच्चरित्रातील 40 वा अध्याय मनोभावे वाचण्याने जीवनात अवतरते बाबांची कृपा; मिळते अचिंत्य फळ
या पार्श्वभूमीवर बेलापूर–पेणधर मेट्रो मार्गावरील सर्व प्रवाशांनी सदर बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन सिडकोच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.