सिंधुदुर्ग: अवकाळी पावसामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र, तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यासोबतच, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी माध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: काय आहे अमृत भारत स्टेशन योजना? जाणून घ्या
उत्तर कर्नाटक आणि गोवा किनाऱ्यावरील पूर्वमध्य अरबी समुद्रावर वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 36 तासांत कमी दाबाच्या पट्ट्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे, समुद्र किनारपट्टीवर प्रतितास 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्याचे वारे प्रतितास 65 किमी वेगाने वाहू शकतात. त्यामुळे सर्व मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अशातच, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. तसेच, गेल्या 24 तासात 56 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा: 82 वर्षीय सदानंद करंदीकरांनी दिली पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी:
येत्या 20 ते 25 मे या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खासकरून, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, 20 मे रोजी दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळे, कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा: HOROSCOPE TODAY 22 MAY 2025: 'या' राशींच्या कामात आहेत नफा मिळण्याचे संकेत
मासेमारी आणि बंदरांना इशारा:
'समुद्रात वादळी हवामान असण्याची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये', असा इशारा देण्यात आला आहे. 21 आणि 24 मे रोजी उत्तर कोकण किनाऱ्यावर 35 ते 45 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग राहू शकतो, तर 20 ते 24 मे दरम्यान दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग 55 किमी प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे, सर्व बंदरांवर 'लोकल कॉशनरी सिग्नल क्रमांक 3 (LC III)' लावण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रतितास राहून तो 65 किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे समुद्र खवळलेला राहील.