मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच, एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड या ठिकाणी पोहोचले होते. माहितीनुसार, या हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांमधील चर्चा जवळजवळ एक तास चालली.
हेही वाचा: दादर अन् गिरगावात लागले काका-पुतण्याचे फलक
मात्र, ही बैठकीमागचं कारण अस्पष्ट आहे. सूत्रांनुसार, आगामी निवडणुकीपूर्वी युतीबद्दल चर्चा असू शकते. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ठाकरे युतीची चर्चा होत आहे. अशातच, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'ही भेट पूर्वनियोजित होती की अचानक?', 'मनसे पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का?' हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
'गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का?', अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार'. सध्या महाराष्ट्राच्या मनात 'दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे' असेच आहे. अशातच, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात खळवळ उडाली आहे.