मुंबई: शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. गोगावलेंच्या दाव्यावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
'शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत'
शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद असो वा आदित्य ठाकरेंना मिळालेले मंत्रिपद असो, हे सर्व निर्णय रश्मी ठाकरेंच्या सांगण्यावरुनच झाले, असा खळबजनक दावा मंत्री गोगावलेंनी केलाय.
बाळासाहेब असताना ते स्वत:चे ऐकायचे मात्र, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात. राजकीय कारभारात रश्मी ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट भरत गोगावले यांनी केलाय. कुणाला निवडणुकीचं तिकट द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही, याचाही निर्णय रश्मी ठाकरे घ्यायच्या असा मोठा दावा गोगावलेंनी केलेला आहे.
हेही वाचा : Indrayani River Bridge Collapse: मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; अपघातात बारा जणांचा मृत्यू
'घरात उठबस करत होता तेव्हा आठवलं नाही'
भरत गोगावले यांनी मंत्रीपद मिळावं यासाठी किती प्रयत्न केले. ज्यावेळी गद्दार फुटले तेव्हा कारणं काय होती. हिंदुत्वासाठी फुटलो आता काय झालं. एका स्त्रीचा लाडकी बहीण म्हणून सन्मान करता आता त्याच स्त्रीला नाव ठेवता, का तर ती ठाकरेंच्या घरची म्हणून असे माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी म्हटले आहे. चार वेळा निवडून आलात, ज्या घरात उठबस करत होता तेव्हा हे आठवलं नाही. एवढं सगळ बोलायला आता कसं आठवलं? असा सवालही त्यांनी गोगावलेंना केला आहे. पालिका अनुषंगाने तयारी कशी करावी, पदाधिकाऱ्यांना तयारीस सांगण हे, पक्ष प्रमुखांचं काम आहे. मुंबईवर मोठा डोळा आहे. त्यानंतर महानगरपालिकेवर असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. मोरारजी देसाईंच्या इतिहासाची पुर्नरावृती होते का असं वाटतयं असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.
'शिवसेनेतील निर्णय कोण घेतात हे माहित नाही'
मी 35 वर्षापासून शिवसेना सोडली आहे. त्यामुळे शिवसेनेतील निर्णय कोण घेतात हे माहित नाही. मी बाहेर आल्यानंतर तिथे पुन्हा जाण्याचा प्रश्न नाही. मी शिवसेना सोडली. त्यानंतर मोठे रणकंदन झाले होते. बाळासाहेब आणि आमचे देखील मोठे वाद झाले होते. मात्र नंतरच्या काळात आम्ही एकत्र बसून वाद मिटवला. पण त्यावेळी शिवसेनेचे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे घेत होते.