Republic Day 2026: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा बहुमान मिळणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावताना दाखवलेले धैर्य, निष्ठा आणि समाजहितासाठी केलेले योगदान याची ही पावती मानली जात आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील 31 कर्मचाऱ्यांना यंदा ‘वीरता पदक’ जाहीर करण्यात आले आहे. नक्षलविरोधी कारवाया, गंभीर गुन्ह्यांवरील धाडसी कारवाई, कायदा-सुव्यवस्था राखताना जीव धोक्यात घालून बजावलेले कर्तव्य यासाठी या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या बलिदानाला देशाने मानवंदना दिली आहे.
वीरता पदक (GM)- पोलीस सेवा
1.अमोल नानासाहेब फडतरे, 2. वासुदेव राजम मडावी, 3.मधुकर पोचाय्या नैताम, 4.संतोष वसंतराव नैताम, 5.कै. सुधाकर बिताजी वेलादी (मरणोपरांत), 6.विलास मारोती पोर्तेट, 7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, 8.ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, 9.दिलीप वासुदेव सदमेक, 10.रामसू देवू नरोटे, 11.आनंदराव बाजीराव उसेंडी, 12.राजू पंडित चव्हाण, 13.अरुण कैलास मेश्राम, 14.नितेश गंगाराम वेलाडी, 15.मोहन लच्छू उसेंडी, 16.संदीप गणपत वसाके, 17.कैलास देवू कोवासे, 18.हरिदास महारू कुलयेती, 19.किशोर चंती तलांडे, 20.अनिल रघुपती आलम, 21.नरेंद्र दशरथ मडावी, 22.आकाश अशोक उईके, 23.स्व. करे इरपा आत्राम (मरणोपरांत), 24.राजू मासा पुसाळी, 25.महेश दत्तूजी जकेवार, 26. रुपेश रमेश कोडापे, 27.मुकेश शंकर सडमेक, 28.योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, 29.घिस्सू वांजा आत्राम, 30.अतुल भगवान मडावी, 31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)
महेश उदाजी पाटील (अतिरिक्त आयुक्त), बाळकृष्ण मोतीराम यादव (पोलीस उपायुक्त), सायरस बोमन इराणी (सहाय्यक पोलीस आयुक्त), विठ्ठल खंडुजी कुबडे (सहाय्यक पोलीस आयुक्त).
उत्कृष्ट सेवेसाठी पदक (MSM)- पोलीस सेवा
राजीव वीरेंद्र कुमार जैन, सुधीर कल्ल्या हिरेमठ, शीला दिनकर साहिल, मोहन मुरलीधर दहीकर, पुरुषोतम नारायण कराड, किरण जितेंद्रसिंह पाटील, नीलम प्रशांत वाव्हळ, अविनाश शंकरराव शिळीमकर, गजानन रामराव शेळके, महेश रमेश तावडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
अग्निशमन सेवा
हरिश्चंद्र वसंत गिरकर, दामोदर वनगड, कांचन बंडू पाटील, काशिनाथ राजनाथ मिश्रा.
नागरी संरक्षण व होमगार्ड
गंगाधर वखाजी वुरकुड, राजेंद्र मधुकरराव बन्सोड, नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली.
सुधारात्मक सेवा
अशोक शिवराम करकर, गोविंद केशव राठोड, राजेंद्र भाऊसाहेब धनगर, सुनील भाऊसो लांडे, प्रल्हाद महिपती शिंदे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेले हे सन्मान महाराष्ट्रातील सुरक्षा व आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल देश कृतज्ञ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 🇮🇳