Tuesday, February 17, 2026 08:43:16 PM

MNS Bala Nandgaonkar On BMC Mayor : मुंबई महापालिकेत उलथापालथ? नांदगावकरांच्या वक्तव्याने खळबळ, बीएमसीत पाहायला मिळणार नवे समीकरणं?

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. यावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुचक विधान केलं आहे.

mns bala nandgaonkar on bmc mayor  मुंबई महापालिकेत उलथापालथ नांदगावकरांच्या वक्तव्याने खळबळ बीएमसीत पाहायला  मिळणार नवे समीकरणं

राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जाहीर झालेल्या आरक्षण सोडतनुसार ठाणे महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती (SC) आणि कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती (ST) यांसाठी महापौरपदाचं आरक्षण मिळालं आहे. दरम्यान यावर बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुचक विधान केलं आहे. मुंबई महापालिकेतही कल्याण-डोंबिवलीसारखा पॅटर्न लागू होईल असं वक्तव्या बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. 

हेही वाचा- Mayor Reservation 2026 : श्रीमंत महापालिकेची चावी महिलांच्या हाती! जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज
यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले की, "मुंबईत आरक्षण हे ओपनमध्ये होते , यावेळी ओपनचा आरक्षण टाकायला नको होते, यावेळी SC आणि ST हवे होते, आरक्षण तिनचे टाकायला हवे होते. तुमच्याकडे ST चा उमेदवार नसल्याने जगलेरी केली आहे, ठाकरें च्या आक्षेप एकदम बरोबर आहे. नियमाप्रमाणे तीन टाकले पाहिजे होते. ठाकरे सेनेने ऑब्जेक्शन घेतले आहे आम्हीही घेत आहोत. आता लॉटरी पडली आहे, मुंबई पक्षप्रमुखांशी बोलू. तुम्ही नियम पाळत नाहीये, सर्व चिठ्ठी टाकायला हवे. देवावर कोण विश्वास ठेवेल? तीनचे आरक्षण त्यांनी टाकायला हवे होते, ते तुम्ही टाकलेले नाही". 

हेही वाचा- BMC Mayor History : मुंबई महापालिकेत आजवर 'या' रणरागिणींनी भूषवलं महापौरपदं; एक वगळता उर्वरीत सगळ्या एकाच पक्षाच्या प्रतिनिधी, वाचा संपूर्ण यादी
कल्याण-डोंबिवली राजकारणावर बाळा नांदगावकर म्हणाले की, "संजय राऊत आणि राज साहेबांची बैठक झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्ष वेगवेगळा निर्णय घेऊ शकतो. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, त्यात काहीही होऊ शकतो, मात्र छगलेरी चालणार नाही. काही निर्णय मनाने घ्यावे लागतात, काही मनाविरुद्ध घ्यावे लागतात. माझ्या मनाने विचार केला तर हा निर्णय मला पटलेला नाही, ही माझी भूमिका राहील".


सम्बन्धित सामग्री