Wednesday, June 25, 2025 01:58:30 AM

Buldhana: नियम धाब्यावर बसवत रस्ता बांधकाम; दीड किलोमीटरच्या रस्त्यावर महिन्याभरात शेकडो अपघात

गेल्या दोन महिन्यांपासून, खामगाव शहराला अकोला शहरासोबत जोडणाऱ्या रस्त्याचे काम केले जात आहे. मात्र, रस्त्याचे बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे.

buldhana नियम धाब्यावर बसवत रस्ता बांधकाम दीड किलोमीटरच्या रस्त्यावर महिन्याभरात शेकडो अपघात

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराला अकोला शहरासोबत जोडणाऱ्या रस्त्याचे काम केले जात आहे. मात्र, रस्त्याचे बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. रस्ता अशा पद्धतीने खोदून ठेवला आहे, ज्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याठिकाणी, मोठं खळक कंपनीने उपरून ठेवले आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्ता बांधकाम यंत्रणेकडे हे काम सोपवले आहे ते दुर्लक्ष करत आहे. 
ज्यापद्धतीने ठेकेदारांनी काम करायला पाहिजे, त्या पद्धतीने ठेकेदारांकडून केले जात नाही. त्यासोबतच, ठेकेदार कंपनी हलगर्जीपणा दाखवत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. 

 

नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया:

'ही कंपनी अक्षरक्ष: निकृष्ठ दर्जाचे काम करत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे. ठेकेदारांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना खूप दगडं लागली आहेत. इतकंच नाही, तर दोन-तीन जणांना दवाखान्यातदेखील नेण्यात आले आहे. आधीची ठेकेदार कंपनीदेखील पळून गेली होती', अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिले आहे. 


खामगाव शहरात होणारे अपघात:

काही वर्षांपूर्वी, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिला. या अपघातात, 12 जण जखमी झाले होते. त्यापैकी, दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. 2023 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात अजून एक अपघात झाला होता. बुलढाणा ते चिखलीला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला होता. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली होती. बुलढाण्यातील जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर असलेल्या सुलतानपूरजवळ एका खाजगी बसचा अपघात झाला होता. बस चालवत असताना चालकाला झोप आल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्यामुळे बस अक्षरक्ष: पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात, सात ते आठ प्रवासी जखमी झाले होते. या जखमींपैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर होती.  


सम्बन्धित सामग्री