Monday, March 09, 2026 02:07:02 AM

Rohit Pawar : अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज ठाकरे यांनाही दिली पुराव्यांसह सविस्तर माहिती

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आज, शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी भेट घेतली.

rohit pawar  अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांनाही दिली पुराव्यांसह सविस्तर माहिती

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आज, शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी भेट घेतली. या अपघाताबाबत त्याच्याकडे असलेली सविस्तर माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या अपघाताचा तपास करताना संपूर्ण पारदर्शकता राखली जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच अजितदादांच्या स्मारकाबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आले. या विमान अपघातात मृत्यू झालेले सुरक्षा कर्मचारी, क्रू मेंबर आणि को पायलट यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांसदर्भातही यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले निवेदन या निवेदनात रोहित पवारांनी म्हंटलं आहे की, अजितदादा पवार महाराष्ट्र यांच्या विमान अपघाताची सर्वंकष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच दुःखद निधन झाले. या दुर्दैवी अपघातात अजितदादांसारखा लोकनेता हिरावला गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला असून या दुर्घटनेविषयी महाराष्ट्राच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या अपघाताच्या कारणांची निश्चित माहिती जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक बाबींकडे लक्ष वेधले जात असून या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची सर्वंकष, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी होणे गरजेचे आहे. या विमान Bombardier Learjet-45 हे दिल्लीस्थित VSR कंपनीने चालवले जात होते. या कंपनीकडे 2028 पर्यंत Air Operator Permit असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कंपनीच्या ताफ्यात Learjet-45 विमान आहे. याच ऑपरेटरच्या Learjet-45XR विमानाचा 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर गंभीर अपघात झाला होता, ज्यामध्ये सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले होते. मात्र त्या अपघाताचा अंतिम तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 2024 मध्ये युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) या संस्थेने गंभीर सुरक्षा उल्लंघनांमुळे VSR चा Third Country Operator (TCO) मान्यता रद्द केली होती, याची माहिती भारतातील DGCA या संस्थेकडे अधिकृतरीत्या देण्यात आली होती.

बारामती विमान अपघाताबाबत विविध माध्यमांतून तसेच तांत्रिक चर्चांमधून काही माहिती समोर येत आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच विमान हवेत स्थिर झाले नसल्याचे तसेच योग्य उंची गाठण्यात अडचण आल्याचे समोर आले आहे. विमान stall झाले असताना तसेच कमी उंचीवर असताना Stall Warning System (SWS) तसेच कार्यरत EGPWS अलर्टची नोंद होणे अपेक्षित होते; मात्र तसे कोणतेही अलर्ट नोंद झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित विमानातील Stall Warning System (SWS), EGPWS यंत्रणा कार्यरत अवस्थेत होती का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याशिवाय विमानाच्या Maintenance संबंधित सुरक्षा प्रक्रियांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच स्थानिक लोकांनी विमान पडल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचे सांगितले आहे. विमानात बेकायदेशीररित्या अतिरिक्त इंधन नेले जात होते का? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. संबंधित VSR कंपनीची अधिक माहिती व कागदपत्रे सार्वजनिक करणे आवश्यक आहे.

या सर्व बाबींचा सखोल व निष्पक्ष तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती, अशा आशयाचे निवेदन रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. 

हेही वाचा : Ncp Jay Pawar-Praful Patel : जय पवार यांनी कुठं बसावं? प्रफुल पटेल यांनी थेट दाखवून दिली जागा; Viral Video

तसेच रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली असून चर्चा केली. राज ठाकरे हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र अमित ठाकरे हेही उपस्थित होते. मला विश्वास आहे की, अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात राज ठाकरे साहेब हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. 


सम्बन्धित सामग्री