Wednesday, April 22, 2026 11:19:10 PM

Rupali Chakankar: भोंदू खरात प्रकरणात मोठी घडामोड! रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी गैरहजर; आता तपास वेगळ्या दिशेने...

अशोक खरात प्रकरणात SIT च्या समन्सनंतरही रुपाली चाकणकर 24 तास उलटूनही चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत त्यामुळे तपासाचा अँगल बदलला असून मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांवर भर देण्यात येत आहे

rupali chakankar भोंदू खरात प्रकरणात मोठी घडामोड रुपाली चाकणकर sit चौकशीसाठी गैरहजर आता तपास वेगळ्या दिशेने

Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीसाठी समन्स बजावूनही तब्बल 24 तास उलटून गेले तरी चाकणकर चौकशीसाठी हजर न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणात शिवनिका संस्थेच्या आजी-माजी विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र चाकणकर यांच्या अनुपस्थितीमुळे तपासाचा फोकस आता इतर पुराव्यांकडे वळवण्यात आला आहे. विशेषतः अशोक खरातच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा: Satara ZP Election Clash: जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील ‘तो’ हाय-व्होल्टेज राडा पोलीस निरीक्षक तुषार दोशींच्या अंगलट; राज्य सरकारची मोठी कारवाई

तपास यंत्रणा सध्या कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी करत आहे. मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, या तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर SITने चौकशीचा अँगल बदलत तांत्रिक पुराव्यांवर अधिक भर दिल्याचे समजते.

चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणताही लाभ झाला होता का, याचाही तपास केला जात आहे. या मुद्द्यावरूनच त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा: Satara ZP Election Case: साताऱ्यात खाकी वर्दी तोंडघशी! 'ते' अपहरण सिद्धच झाले नाही; जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय नाट्याला कोर्टाचा मोठा दणका

चाकणकर चौकशीसाठी केव्हा हजर होणार, याबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे त्या SITसमोर उपस्थित राहतील का, की या प्रकरणात आणखी काही घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक खरात प्रकरणाचा तपास अधिकच वेगाने पुढे सरकत असून, चाकणकरांच्या गैरहजेरीमुळे या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सम्बन्धित सामग्री