Friday, June 12, 2026 11:29:33 PM

Rupali Chakankar On Ashok Kharat Case : खरात प्रकरणी SIT कडून चाकणकरांची सुमारे 6 तास चौकशी; महत्त्वाची अपडेट समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंबंधी रुपाली चाकणकर यांची गेल्या साडेपाच तांसापासून SIT कडून चौकशी सुरू होती.

rupali chakankar on ashok kharat case  खरात प्रकरणी sit कडून चाकणकरांची सुमारे 6 तास चौकशी महत्त्वाची अपडेट समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गेल्या साडेपाच तांसापासून SIT कडून चौकशी सुरू होती, त्यानंतर तब्बल 6 तास SIT पथक प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडून रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी झाली. अशोक खरातसोबत केव्हा पासून संबंध होते, शिवणीका संस्थांवर असताना या सगळ्या खरात प्रकरणाची माहिती होती का...? अशा प्रकारचे प्रश्न SIT कडून चाकणकरांसमोर उपस्थित करण्यात आले. 

हेही वाचा- PM Modi Security Breach: बंगळुरूमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रम स्थळाजवळ आढळली स्फोटकं; सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर
तसेच अशोक खरात सोबत ज्या पूजा विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? पूजा विधीनेच काही आर्थिक संबंध खरात सोबत जोडले होते का? अशोक खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आहेत आणि कोणत्या कार्यक्रमातील आहे? शिवाय शिवनीका संस्थांच्या बैठकांमधून कोणते कामकाज सुरू होते? याची चौकशी करण्यात आली आहे. इतर राजकीय मंडळीचे मंदिरात येत होते ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून येत होते? खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक अकाउंट मधून झाले यांची चौकशी करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री