Sunday, November 09, 2025 06:52:53 PM

सदाभाऊ खोत यांची फडणवीसांकडे अनोखी मागणी

सदाभाऊ खोत हे नेमहीच आपल्या विधानातून चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनोखी मागणी केलीय.

सदाभाऊ खोत यांची फडणवीसांकडे अनोखी मागणी

महाराष्ट्र: सदाभाऊ खोत हे नेमहीच आपल्या विधानातून चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनोखी मागणी केलीय.कोणीही कितीही देव पाण्यात ठेवू दे देवा भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार मात्र मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल,अशा मिश्कील शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे. 
सांगलीच्या विटा येथे ते बोलत होते.

हेही वाचा: अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर

आमदार गोपीचंद पडळकरांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील,असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्कील भावना व्यक्त केली,त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

सदाभाऊ खोत यांची थोडक्यात राजकीय कारकीर्द: 
सदाभाऊ खोत (जन्म:1 जून, 1964) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. ते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक माढा (लोकसभा मतदारसंघ) येथून SWP/NDA उमेदवार म्हणून लढवली.10 जून 2016 रोजी ते महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य जागेवरून विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. 8 जुलै रोजी त्यांचा महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.


 


सम्बन्धित सामग्री