Saturday, February 14, 2026 04:41:50 AM

Sanjay Raut: "आता राष्ट्रवादीवर गिधाडे तुटून पडतील" अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊतांच्या आरोपांची तोफ दिल्लीमधून धडाडली

अजित पवारांकडे भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या आणि त्यानंतरच अपघात झाला, असा दावा करत राऊत यांनी निष्पक्ष न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

sanjay raut quotआता राष्ट्रवादीवर गिधाडे तुटून पडतीलquot अजित पवारांच्या निधनानंतर संजय राऊतांच्या आरोपांची तोफ दिल्लीमधून धडाडली

मुंबई: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात अद्यापही शोककळा आहे. मात्र, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले असून शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "दादांचा अपघात हे एक रहस्य असून, जो भाजपच्या विरोधात जातो त्याचा एक तर जेलमध्ये किंवा मृत्यूशी गाठ पडते," अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांच्या या दाव्यांमुळे आता राजकीय वर्तुळात वादाचा नवीन धुरळा उडाला आहे.

भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल 

संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला की, अजित पवार हे भाजपच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत होते. विशेषतः पिंपरी चिंचवड महापालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये कशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार झाला, याची सर्व माहिती दादांकडे होती. "अजित पवार अनेक वर्षे अर्थमंत्री राहिल्याने त्यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे होती. त्यांनी 15 जानेवारीला फाईल उघडण्याचे संकेत दिले आणि अवघ्या 10 दिवसांत त्यांचा अपघात झाला, हे 'लोया' प्रकरणासारखेच रहस्यमय आहे," असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: Parth Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल; पार्थ पवारांच्या खांद्यावर दिल्लीची धुरा?

ऑपरेशन लोटस'ला धक्का बसणार होता?

राऊत यांच्या दाव्यानुसार, अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत जाण्याच्या तयारीत होते. "मी परत येण्यास तयार आहे," असे दादांचे जुने विधान राऊतांनी यावेळी अधोरेखित केले. जर अजित पवार भाजपची साथ सोडून स्वगृही परतले असते, तर तो भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'साठी मोठा धक्का ठरला असता. "हा धोका टाळण्यासाठीच तर काही घडले नाही ना?" असा संशय राऊत यांनी व्यक्त केला असून, या अपघाताची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रफुल्ल पटेलांची घाई आणि व्हायरल फोटोंचे गौप्यस्फोट

पक्षाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. "अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेलांना अध्यक्ष होण्याची घाई झाली आहे," असा टोला त्यांनी लगावला. इतकेच नाही तर, संसदेच्या आवारात प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांचे हातात हात घालून असलेले फोटो व्हायरल झाले आहेत, त्यावरूनही राऊतांनी संशय व्यक्त केला. "ज्या पक्षासाठी अजित पवार यांनी आयुष्य वेचले, तो आता मराठी पक्ष राहिला नसून त्यावर गिधाडे तुटून पडणार आहेत," असे ते म्हणाले.

नवाब मलिक आणि सावरकर सदनाचा उल्लेख

यावेळी राऊत यांनी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवाब मलिक यांच्या ताब्यातील नगरसेवकांसाठी त्यांची 'चाटूगिरी' करत असल्याची टीका त्यांनी केली. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, असेही ते म्हणाले. सावरकर सदन आणि सावरकरांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राच्या मनात शंकांचे काहूर

अजित पवारांसारखा कणखर नेता अशा प्रकारे अपघातात जाणे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे आता सर्वसामान्यांच्या मनातही शंकांचे काहूर माजले आहे. अजित पवार यांचे जुने सहकारी अमोल मिटकरी यांनीही यापूर्वी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले होते. आता राऊतांनी केलेल्या 'डर्टी पॉलिटिक्स'च्या आरोपांमुळे या अपघाताच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार स्मार्ट; पश्चिम रेल्वेवर 325 हायटेक ATVM मशीन दाखल, लांब रांगांतून मिळणार सुटका


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या