महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता नुकतेच महापौरपदासाठी आरक्षण सोडत पार पडले. यानंतर सर्वत्र मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं असताना, आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना आवाहन केले आहे. मुंबईचा महापौर मराठी व्हावा आणि मुंबईच्या महानगरपालिकेवर भगवा फडकावा यासाठी शिंदेंनी भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंना मदत करावी असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदेंना आव्हान कमी विनंती केली आहे. भास्कर जाधवांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीयवर्तूळात खळबळ माजली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. असं असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
हेही वाचा- Eknath Shinde On KDMC MNS Yuti : "… म्हणून मनसेसोबत युती" एकनाथ शिंदेंकडून मनसे युतीमागचं कारण उघड; भास्कर जाधवांच्या ऑफरवर काय म्हणाले?
यावेळी संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. देशातून सर्व्ह मान्यवर आले आहेत अनेकांनी शुभसंवाद पाहिले. पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचा फोटो बाळासाहेब यांच्यासोबतचा ट्वीट करून... बाळासाहेब यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली ऊर्जा मिळाली त्यांनी देशाला कशी दिशा दाखवली. अशी शिवसेना प्रमुखानं आदरांजली वाहिली. त्याच मोदीनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली. शिवसेना प्रमुख पदावर शिंदेंना बसवले. आता मोदी शिंदेंकडून प्रेरणा घेतात का? आज संध्याकाळी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. उधव ठाकरे राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेबनी महाराष्ट्राला देशाला फार मोठा एकजुटीचा विचार दिला. बाळासाहेब यांनी सामान्य माणसाला शूर केले. महाराष्ट्राला त्यांचे विस्मरण कधी होणार नाही".
हेही वाचा- Bhaskar Jadhav : "राजकीय मतभेद बाजूला सारून..." भास्कर जाधवांच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ; थेट शिंदेंना विनंती
पुढे भास्कर जाधवांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले की, "भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर सोडणार नाही. शिवसेना प्रमुखांचे फोटो ते राजकीय स्वार्थासाठी वापरतात. असे असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे अस्तित्व नसताना निर्माण करून दिले त्यांचा पक्ष तुम्ही फोडलात. शिवसेनेशी सबंध नसताना नामर्दांच्या हाती शिवसेना दिली. शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही, एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत. पण काय करायचे ते पक्ष ठरवेल, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव कळवळत नाही. भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटली आहे. ते तुम्हाला दिसत आहे. ज्या पद्धतीने भाजपने पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या. बाळासाहेबांचा विचार असा नवता. यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या हे बाळासाहेब ठाकरे यांचे हे वक्तव्य आहे". असं संजय राऊत म्हणाले आहे.