परभणी महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सय्यद इकबाल खाजा यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. मात्र, या निवडीनंतर शिंदेगटाकडून ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला असून, परभणीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा- NCP Merger Update : विलिनीकरणाबाबत शिंदेंचा मोठा दावा, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची रोखठोक भूमिका
याचपार्श्वभूमिवर संजय शिरसाट म्हणाले की, "उबाठाचा पहिला मुस्लिम महापौर परभणीत झालाय. मुस्लिम माणसाला आमचा विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेची रचना झाली होती, त्या पद्धतीने शिवसेना चालली होती. त्यांनी मूळ भागाला दिलेला हा छेद आहे. मुंबईत मराठी माणसाशिवाय कोणीही महापौर होऊ नये, हिंदी भाषिकही नको, मुस्लिम तर दूरच.. मराठी माणसासाठी लढतो म्हणणारे हे आता गेले कुठ? यांना गुजराथी, सिंधी,हिंदी भाषिक चालत नाही आणि मुस्लिम चालतात याचा अर्थ यांनी भूमिका बदललीये, हिंदू वोट विभाजन झाल्यावर, मते वळल्यानंतर हे (मुस्लिम) वोट मिळावे म्हणून हा उबाठाचा प्रयत्न आहे. आमच्यावर जे आरोप व्हायचं, ते आरोप आता यांच्यावर होत आहेत. (उबाठा) हे विकले गेले आहे,चंद्रपूरमधे यांनी तडजोड केलीये. अशीच तडजोड यांना महाराष्ट्रात सर्वत्र करावी लागणार आहे. काही जिल्हा परिषद सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. कुणी पाठिंबा देत असेल तर ते घेऊ नये, असे काही करार झालेले नाही. शिंदे सर्व निर्णय घेतील.महराष्ट्रात सर्वत्र महायुतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष होतील. संजय राऊतच्या डोक्यात झालेला तो परिणाम आहे. उचलली चिब लावली दाढीला, हे आम्हला शिकवायला निघाले, तू दाढीला जिब लावून दाखव बर. बाळासाहेब असते तर तुमच्या पृष्ठभागावर लाथ मारली असती. ज्यांना शिवसेना कळली नाही. त्यांनी दलाली करण्यापेक्षा घरी बसावे".