Sunday, July 13, 2025 10:18:59 AM

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी, स्नान व शासकीय स्वागताने भक्तीमय वातावरणात अकलूजमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Pandharpur Wari 2025: देहु ते पंढरपूर आषाढी पायी वारीसाठी निघालेल्या जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील निरा नदीचा पुल ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच जेसीबीतुन पुष्पवृष्टी करीत सोलापूर जिल्हा प्रशासनाकडुन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांचे व अश्वाचे पुजन करुन स्वागत करण्यात आले.

श्री.क्षेत्र देहु ते श्री.क्षेत्र पंढरपुर येथे आषाढी पायी वारी निमित्ताने लाडक्या विठुरायाच्या दर्शनास निघालेल्या जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने कालचा सराटी येथील मुक्काम आटोपल्यानंतर सकाळी निरा नदीच्या पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले त्यानंतर सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील निरा नदीचा पुल ओलांडत पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात येताच सोहळ्यावर जेसीबीतुन फुलांची उधळण करत जिल्ह्याच्यावतीने शासकीय स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, खा.धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते,  स्वागतानंतर सरहद्द ते अकलुज पालखी रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, खा. धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी केले.

हेही वाचा: Pandharpur Wari 2025: वारीला जाता आलं नाही? हरकत नाही, विठोबा येईल तुमच्या घरी; जाणून घ्या कसं

हेही वाचा: Pandharpur Wari 2025 Wishes: खास शुभेच्छा, प्रेरणादायी कोट्स आणि महत्वाची माहिती

या भक्तिभावपूर्ण वातावरणात अकलूज शहराने पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करत वारकऱ्यांच्या उत्साहात भर घातली. रथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पुष्पवृष्टी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात अकलूजने आपल्या लाडक्या तुकोबारायांची अगदी भक्तीभावाने व श्रद्धेने आरती करत पालखीचे स्वागत केले. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमला.


सम्बन्धित सामग्री