राज्यात कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कुंभमेळ्यासाठी 1700 झाडं तोडावी लागतील अशी नोटीस महापालिकेनं काढली आहे. कुंभमेळ्यातील विकासकामांच्या नावाखाली नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीला पर्यावरण संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. हजारो झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत पर्यावरण कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत.
हेही वाचा- Navjot Kaur Sidhu Suspended: मोठी बातमी! नवज्योत कौर सिद्धू काँग्रेस पक्षातून निलंबित; फक्त 'या' एका विधानामुळे करण्यात आली कारवाई
यावर पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांसह अभिनेता सयाजी शिंदे यांनीही या मुद्द्यावर पुढाकार घेत तीव्र विरोध दर्शवला आहे. इतकचं नव्हे तर या वृक्षतोडीवरून त्यांनी नाशिकमधील वृक्षतोड रोखण्यासाठी आंदोलनात सहभाग नोंदवत राज्य सरकारकडे कठोर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर हे राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते.
हेही वाचा- Santosh Deshmukh Case : क्रूरतेचा कळस, अमानुषतेची परिसीमा गाठणाऱ्या निर्घृणतेची वर्षपूर्ती; संतोष देशमुखला न्याय कधी?, कुटुंबिय प्रतिक्षेत
दोघांनी राज ठाकरेंशी या प्रकरणावर चर्चा करण्याची तयारी दाखवली असून या भेटीकडे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या नाटकात सयाजी शिंदे कलाकार आहेत, असं म्हणत राज ठाकरे आणि सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "हमको पता था, ते म्हणतात ना की कोणाची कुठपर्यंत धाव... तर ती धाव आता समजली की, ती धाव राजकारणापर्यंत होती. राज ठाकरे यांच्या नाटकात सयाजी शिंदे कलाकार आहेत".
हेही वाचा- Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु..."
"सयाजी शिंदे यांनी लक्षात ठेवावं राज ठाकरे यांच्या घरी चहापान काढलं जातं आणि ही संस्कृती बनली आहे, पण ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. तुमचही चहापान कधी तरी काढले जाईल. सयाजी उलटे पडले आहेत, सयाजी यांचं नाटक समोर आलं आहे. मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील चहापाणी कधीकाळी काढण्यात आलं होतं. मला तुम्हाला सांगायचं आहे, की कधी ना कधी तुमचं चहापाणी देखील काढलं जाणार. माझ्या ट्विटमध्ये जो फोटो दाखवला आहे त्यामध्ये एक कप दाखवलेला आहे चहाचा, हे कधी ना कधीतरी काढलं जाईल याच्यात मला शंका नाही. परंतु आज सयाजी शिंदे यांचं पितळ उघडं पडलं आहे".