Saturday, February 14, 2026 12:47:27 PM

Sambhaji Bhide On Sharad Pawar: 'शरद पवार राष्ट्रद्रोह...'; संभाजी भिडे यांचे शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य

भिडे यांनी शरद पवार यांचा उल्लेख थेट 'राष्ट्रद्रोह' असा केला असून, लवासा प्रकल्पावरून निशाणा साधताना &quotलवासाची कीड मुळासकट काढून टाकली पाहिजे,&quot असे प्रक्षोभक विधान केले आहे.

sambhaji bhide on sharad pawar शरद पवार राष्ट्रद्रोह संभाजी भिडे यांचे शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide On Sharad Pawar: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वणवा पेटला आहे. भिडे यांनी शरद पवार यांचा उल्लेख थेट 'राष्ट्रद्रोह' असा केला असून, लवासा प्रकल्पावरून निशाणा साधताना "लवासाची कीड मुळासकट काढून टाकली पाहिजे," असे प्रक्षोभक विधान केले आहे. या विधानानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  

'लायकी'वरून रंगला होता कलगीतुरा
संभाजी भिडे आणि शरद पवार यांच्यातील हा संघर्ष नवा नाही. यापूर्वी, मराठा आरक्षणावरून भिडेंनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावर शरद पवार यांनी अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिली होती. "संभाजी भिडे ही व्यक्ती काही बोलण्याच्या किंवा कॉमेंट करण्याच्या लायकीची आहे का?" असा प्रतिसवाल करत पवारांनी त्यांची दखल घेण्यास नकार दिला होता.  

हेही वाचा - Sanjay Shirsat : 'आम्ही युती धर्म पाळायचा आणि तुम्ही? फडणवीससाहेब काय आदेश द्यायचा तो द्या पण...'; संजय शिरसाट का संतापले?

लवांडे यांना धमक्या आणि 'तालिबानी' विचारांचा आरोप

फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये हा वाद टोकाला पोहोचला होता. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शिवप्रतिष्ठानवर टीका करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर, त्यांना भिडेंच्या समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप करण्यात आला होता. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी पोलीस महासंचालकांकडे दाद मागितली होती. यावर प्रत्युत्तर देताना लवांडे यांनी भिडेंच्या विचारधारेची तुलना 'तालिबानी' विचारांशी केली होती, ज्यामुळे वाद अधिकच चिघळला होता.

मिशा कापण्याचा इशारा आणि कार्यकर्त्यांचा संताप

दरम्यान, गेल्या वर्षी भिडेंनी महिलांच्या पेहरावावरून केलेल्या एका विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट "भिडेंच्या मिशा कापून टाकू" असा आक्रमक पवित्रा घेतला होता. आता पुन्हा एकदा भिडेंनी पवारांना 'राष्ट्रद्रोह' म्हटल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या