Sunday, July 13, 2025 11:08:54 AM

ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांची दांडी?

5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे-राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यात शरद पवार सहभागी होणार नाहीत. नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे.

ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांची दांडी

Sharad Pawar Skips July 5 Victory Rally: राजकारणात मोठी चर्चा ठरलेल्या 5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

या मेळाव्याचे आयोजन शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांच्या वतीने करण्यात आले आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयावरून पुकारण्यात आलेला मोर्चा रद्द झाल्यानंतर, या निर्णयाच्या विरोधात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हा विजयी मेळावा घेतला जात आहे.

शरद पवार यांचं स्पष्टीकरण

'मी 5 जुलै रोजी या मेळाव्यात जाणार नाही. त्या दिवशी माझे इतर नियोजित कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे मी गैरहजर राहणार आहे,' असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं. ते पुढे म्हणाले, 'आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांना सहभागी व्हायचे असल्यास ते निर्णय घेऊ शकतात. माझ्या अनुपस्थितीचा त्याच्याशी काही संबंध नाही.'

हेही वाचा: Guru Purnima 2025 Date: गुरु पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मेळाव्याची पार्श्वभूमी

हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी एकत्र येत मोठा जनआंदोलनात्मक मोर्चा पुकारण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने हा निर्णय मागे घेतल्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला. त्याऐवजी विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की खासदार संजय राऊत यांनी त्यांना दूरध्वनी करून या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं.

 महाविकास आघाडीचा सहभाग?

या मेळाव्यात महाविकास आघाडीतील इतर पक्ष सहभागी होणार का, याकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र, शरद पवार यांच्या अनुपस्थितीमुळे या एकत्रित मेळाव्याच्या राजकीय संकेतांबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील सहभागी होणार असल्याचं जरी सांगितलं गेलं, तरी शरद पवार यांचा थेट सहभाग नसल्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका स्वतंत्र राहील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 


सम्बन्धित सामग्री