Monday, March 09, 2026 07:58:57 AM

NCP Sharad Pawar Support Mahayuti : मुंबई महानगरपालिकेत मोठी घडामोड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय

मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सोबत निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार पवार गटाचा नगरसेवक आता महायुतीसोबत हतमिळवणीी करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ncp sharad pawar support mahayuti  मुंबई महानगरपालिकेत मोठी घडामोड शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय

मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सोबत निवडणूक लढविणाऱ्या शरद पवार पवार गटाचा नगरसेवक आता महायुतीसोबत हतमिळवणीी करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी गटाचा एकमेव नगरसेवक मुंबईत महायुतीला समर्थन करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरद पवारांचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांचा महायुतीला पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा देणार असून मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठींबा देण्याकरता एकत्र आल्याचे पाहायला मिळणार आहे. दरम्यान मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरला असून 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. अशातच मुंबईतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. 



सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या