Monday, March 09, 2026 02:36:11 AM

Satara Karad Crime : कराडमध्ये धक्कादायक प्रकार! 45 वर्षीय प्रियकरावर कुऱ्हाडीने वार; स्वत: महिलेनंच दिली पोलिसांना खबर

कराडला आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. प्रियकर संशय घेत असल्याने प्रियसीने खून केल्याचे कारण समोर येत आहे.

satara karad crime  कराडमध्ये धक्कादायक प्रकार 45 वर्षीय प्रियकरावर कुऱ्हाडीने वार स्वत महिलेनंच दिली पोलिसांना खबर

कराडला आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. प्रियकर संशय घेत असल्याने प्रियसीने खून केल्याचे कारण समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी सारिका कोळीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती महिला इंगवलेवस्ती येथे राहत होती. तिच्यासोबत तीन मुली देखील त्या वस्तीत चार वर्षांपासून राहत होते. दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एका लहान मुलीसह ती सध्या एकटीच राहत होती.

मंगळवारी रात्री प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला. पहाटे दोघांच्यात भांडण झाले असावे. भांडणाच्या रागात संबंधित महिलेने प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला. खून केल्यानंतर स्वतः तिनेच पोलिसांना माहिती दिली. या घटनेतील आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मरीआप्पा काळे वय 45 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे... तर सारिका चंद्रकांत कोळी असे ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधातून अनेकदा वाद निर्माण होऊन गंभीर गुन्हे घडल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यामध्ये, अनैतिक संबंधातून होत असलेल्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यातच, आता कराडमधील सांगली शहरातील आगाशिवनगर येथे एका 45 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 


सम्बन्धित सामग्री