Friday, March 13, 2026 10:10:04 PM

Badlapur Ovary Trafficking: बदलापुरात अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस; तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

badlapur ovary trafficking बदलापुरात अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

बदलापूरच्या ज्युवेली गावात एका धक्कादायक प्रकरणाची उकल झाली आहे. या प्रकरणात काही महिलांनी गरजू स्त्रियांच्या अंडाशयांचा बेकायदेशीररीत्या व्यापार सुरू केला होता. पोलिसांनी त्वरित कारवाई करत तीन आरोपी महिलांना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, आरोपी महिला सुलक्षणा गाडेकर यांनी घरातच गर्भाशयात स्त्री बीज वाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स साठवले होते. पैशांच्या लालचातून गरजू महिलांना हे इंजेक्शन्स देण्यात येत होते. त्याचबरोबर, काहींना बेकायदेशीर सोनोग्राफी करून अंडाशयाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात होता. नंतर या महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवून, ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भाशयातील अंडाशय काढले जात होते.

प्रकरण उघडकीस येण्यामागे स्थानिक रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना तक्रार केली. बदलापूर पोलिसांनी तपास सुरू करून ज्युवेली गावातील सुलक्षणा गाडेकर आणि तिच्या साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना अटक केली आहे. त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली गेली आहे.पोलिसांनी आरोपींच्या घरावर छापा मारून गर्भाशयासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, खोटे प्रतिज्ञापत्र, पीडित महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. आता पोलिस अधिक तपास करत असून, किती महिला या रॅकेटचा बळी ठरल्या याचा शोध सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री